रांजणगाव आरोग्य केंद्रात दोनशे मुलांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रांजणगाव आरोग्य केंद्रात
दोनशे मुलांचे लसीकरण
रांजणगाव आरोग्य केंद्रात दोनशे मुलांचे लसीकरण

रांजणगाव आरोग्य केंद्रात दोनशे मुलांचे लसीकरण

sakal_logo
By

रांजणगाव गणपती, ता. ३ : रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पहिल्या दिवशी दोनशे मुलांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॅा. स्नेहल घोडेराव यांनी दिली.

लसीकरणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर
यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी डॉ. घोडेराव बोलत होत्या. आरोग्य सहायक पांडुरंग शेळके, आरोग्य सेवक रवींद्र तांदळे, चैत्राली सुर्वे, डॅा. प्राची क्षिरसागर, आरोग्य सेविका रोहिणी सोनटक्के आदी या वेळी उपस्थित होते.
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोरोना लसीकरणाबाबतचे काम अग्रेसर आहे. आतापर्यंत पहिल्या व दुसऱ्या लसीकरणाचे काम ९९ टक्के झाले असून आता १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. ओमिक्रॅान व संभाव्य तिसऱ्या लाटेला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top