
मासळीचे दर तेजीत
मार्केट यार्ड : मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात मासळीचे दर तेजीत आहेत. बाजारातील आवक-जावक कायम असल्याने मटण व चिकनचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. मात्र, मागणीअभावी गावरान अंड्याचे भाव शेकड्यामागे २० रुपये तर इंग्लिश अंड्याचे भाव ३० ते ४० रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात डझन व नगाचे दर स्थिर आहेत.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची आठ टन, खाडी १५० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची २० टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १४००-१५००, मध्यम : १०००-१२००, लहान : ९००-१०००, भिला : ८५०-९००, हलवा : ६००-७००, सुरमई : ८००-१०००, रावस : ६००-१०००, घोळ : ५००-६००, करली : २८०-३६०, करंदी : ३६०-४००, भिंग : ४००, पाला : ९००-१५००, वाम : ४००-७००, ओले बोंबील : २००-३२०. कोळंबी : लहान ः २४०-३६०, मोठी : ४००-६००, जंबोप्रॉन्स : १५००-१६००, किंगप्रॉन्स : ८००-८५०, लॉबस्टर : १६००-१८००, मोरी : २००-४००, मांदेली : १००-१६०, राणीमासा : १६०-२४०, खेकडे : ३००-४००, चिंबोऱ्या : ४८०-५५०. खाडीची मासळी : सौंदाळे : २४०-३२०, खापी : ३६०, नगली : ४००-४८०, तांबोशी : ४००-४८०, पालू : २४०-२८०, लेपा : २००-३००, बांगडा : लहान : १४०-१६०, मोठा : २००-२४०, शेवटे : २००-२४०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १४०-१६०, तिसऱ्या : २००-२४०, खुबे : १००-१४०, तारली : १६०-१८०. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४००-४८०, शिवडा : २४०-२८०, खवली : २८०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २४०-२८०, वाम : ५००-५५०. मटण : बोकडाचे ७००, बोलाईचे ७००, खिमा ७००, कलेजी ७४०. चिकन २४०, लेगपीस २९०, जिवंत कोंबडी १८०, बोनलेस ३४०.
अंडी : गावरान (शेकडा) ८००, डझन १०८, प्रतिनग ९.
इंग्लिश (शेकडा) ३९०, डझन ६०, प्रतिनग ५.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..