थकबाकीसाठी शिक्षकांचे काम बंद आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीसाठी शिक्षकांचे काम बंद आंदोलन
थकबाकीसाठी शिक्षकांचे काम बंद आंदोलन

थकबाकीसाठी शिक्षकांचे काम बंद आंदोलन

sakal_logo
By

पुणे, ता. २३ ः श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची मागील पाच वर्षांची थकबाकी रक्कम मिळावी, यासह इतर मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला बुधवारी (ता.२२) शिक्षक हितकारिणी संघटनेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश पवार यांनी पाठिंबा जाहीर केला.

या विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मागील सुमारे ५८ महिन्यांची थकबाकी मिळावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी, १०, २० आणि ३० या योजनेचा लाभ मिळावी आदी मागण्यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे. पाचव्या दिवशी प्रा. ज्ञानेश्‍वर चाबुकस्वार, एसएनडीटी महिला विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गंधे, सहसचिव विलास पावळे, गोरखनाथ चव्हाण, महेश बच्छाव यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनाला उपस्थित होते.