पार्कातील पायवाटेवरून मनसे आंदोलनाची वाटचाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पार्कातील पायवाटेवरून मनसे आंदोलनाची वाटचाल
बालविवाह रोखण्यासाठी आता न्यायालयीन लढा

पार्कातील पायवाटेवरून मनसे आंदोलनाची वाटचाल

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : ट्विट, समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया अशा गोतावळ्यात अडकलेल्या मनसेला शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाचा नव्याने सूर सापडला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मनसेच्या हाती आयता मुद्दा दिला आहे. शिवाजी पार्कातील सुशोभीकरणात बांधण्यात येणाऱ्या पायवाटेला मनसेने विरोध केला आहे.
रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हा मनसेचा बाणा. पण कोरोना काळात आंदोलने बंद झाल्यानंतर मनसेला केवळ पक्षाच्या ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया उमटत होत्या. पालिका निवडणूक होऊ घातली असताना मनसेकडून कोणतेही मोठे आंदोलन उभारले जात नसल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत होते. त्यात शिवसेना पालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्क मैदानात पर्जन्यजल संधारण प्रकल्प राबवत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पार्काच्या मध्यभागी मातीची पायवाट बांधण्यात आली आहे. ती बांधण्यासाठी त्याखाली खडी टाकण्यात आली होती. ही खडी टाकण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. मात्र, त्यानंतरही पालिकेने हे काम पूर्ण केले. या विरोधात अनेक महिन्यांनंतर मनसे रस्त्यावर उतरली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी हे आंदोलन केले.
...
मनसेला सद्यस्थितीत दादर, माहीम आणि वरळी या भागांतून आगामी निवडणुकीत चांगली साथ मिळू शकते. या भागांतील रहिवाशांसाठी शिवाजी पार्क मैदान महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे मनसे हा मुद्दा पेटता ठेवण्याच्या प्रयत्नात राहील, हे निश्‍चित आहे, असा होरा जाणकारांनी वर्तवला आहे.
...

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..