Exam-Cheat
Exam-Cheat

दहावी-बारावी परीक्षेत ‘कॉपी’ची २५९ प्रकरणे

दहावी-बारावीच्या परीक्षेतील ‘कॉपी’चे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पथकांनी जवळपास २५९ गैरमार्ग प्रकरणे पकडली आहेत.
Summary

दहावी-बारावीच्या परीक्षेतील ‘कॉपी’चे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पथकांनी जवळपास २५९ गैरमार्ग प्रकरणे पकडली आहेत.

पुणे - दहावी-बारावीच्या परीक्षेतील (SSC and HSC Exam) ‘कॉपी’चे (Cheat) गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पथकांनी जवळपास २५९ गैरमार्ग प्रकरणे पकडली आहेत. अधिकाऱ्यांमार्फत या गैरप्रकारांची चौकशी करून विद्यार्थी, पर्यवेक्षक व संबंधितांवर कारवाई (Crime) केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले.

परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी मंडळाने राज्यात भरारी पथके नेमली आहेत. याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन केल्या आहेत. विशेष महिला भरारी पथक, काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके कार्यान्वित आहेत. तसेच मंडळ सदस्य, शासकीय अधिकारी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देत आहेत. याशिवाय, परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्र व उपकेंद्रांवर कार्यरत आहेत.

गैरप्रकाराबाबत होणारी कारवाई

  • विद्यार्थ्यांवर होणारी कारवाई : संबंधित विद्यार्थ्याचे त्या-त्या विषयात (कॉपी प्रकरण पकडलेला विषय) संपादन केलेले गुण रद्द केले जातात. त्या विषयांचा पेपर पुन्हा पुढील परीक्षेत द्यावा लागतो. गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीने कारवाई होत आहे. त्यापूर्वी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सरसकट सर्व विषयात मिळालेले गुण रद्द केले जात होते आणि त्याला सर्व विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागत होती.

  • तोतया विद्यार्थ्यांवर (डमी) होणारी कारवाई : कमीतकमी दोन ते जास्तीत जास्त सहा परीक्षांपर्यंत संबंधित विद्यार्थ्याला परीक्षा देण्यापासून प्रतिबंधित केले जाते. संबंधित विद्यार्थ्याचे गुन्ह्यांचे स्वरूप किंवा इतर गुन्ह्यांची नोंद घेऊन ही कारवाई करण्यात येते.

  • पर्यवेक्षक, शिक्षक संबंधितांवर होणारी कारवाई : कॉपी प्रकरणी जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्तीची चौकशी केली जाते. संबंधित संस्थेला गुन्ह्याचे स्वरूप पाहून सौम्य ते तीव्र स्वरूपाची कारवाई करण्यास सांगण्यात येते. यामध्ये गुन्हा नोंद करणे, पदोन्नती रोखणे अशी कारवाई होऊ शकते.

(स्रोत : शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ)

गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी अधिकारी नेमण्यात येतो. त्यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थी, पर्यवेक्षकाची चौकशी केली जाते. गैरप्रकाराची शाहानिशा करून सत्यता पडताळली जाते. त्यावरून चौकशी अहवाल तयार केला जातो. त्यानंतर प्रत्येक विभागीय मंडळात एक समिती कार्यान्वित असते. या समितीसमोर चौकशी अहवाल सादर केला जातो. त्यामार्फत मंडळ नियमावलीनुसार शिक्षा केली जाते.

- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

पाच ‘डमी’ विद्यार्थी आढळले

  • परीक्षेदरम्यान तोतयागिरीची (डमी) पाच प्रकरणे आढळली

  • यात बारावीच्या परीक्षेत मुंबईमध्ये चार, तर पुण्यात एक विद्यार्थी

  • दहावीच्या परीक्षेत अद्याप डमी विद्यार्थी सापडला नाही

सर्वाधिक ‘कॉपी’ प्रकरणे होणारे विषय (आतापर्यंत)

  • बारावी : इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र

  • दहावी : इंग्रजी

विभागीय मंडळनिहाय ‘कॉपी’ची प्रकरणे

विभागीय मंडळ दहावी बारावी

पुणे १४ ०२

नागपूर ३१ ०४

औरंगाबाद १३ ४२

मुंबई ०३ १८

कोल्हापूर -- ०१

अमरावती १४ १००

नाशिक ०२ ०३

लातूर ०१ ११

एकूण ७८ १८१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com