कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी एक संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या
प्रवेशासाठी आणखी एक संधी
कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी एक संधी

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आणखी एक संधी

sakal_logo
By

पुणे, ता. १ : राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या कृषी पदवी अभ्यासक्रमाकरिता एक अतिरिक्त चौथी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविणार आहे. या चौथ्या अतिरिक्त प्रवेश फेरीतंर्गत प्रवेश वाटप यादी मंगळवारी (ता.४) प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) दिली आहे.
प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या कृषी पदवी अभ्यासक्रमाकरिता नियोजित वेळापत्रकानुसार तीन ऑनलाइन प्रवेश वाटप फेऱ्या आतापर्यंत राबविल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार जागेवरील प्रवेश फेरीपूर्वी (स्पॉट राऊंड) एक अतिरिक्त चौथी ऑनलाइन प्रवेश फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीत प्रवेशाचे वाटप झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात पाच आणि सहा जानेवारी या कालावधीत प्रवेशाकरिता उपस्थित राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
प्रवेश प्रक्रियेतंर्गत ‘जागेवरील प्रवेश फेरीसाठी’ जागांचा तपशील ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध करणार आहे. तर राज्यात दहा ते १३ जानेवारी या कालावधीत २० प्रवेश प्रक्रिया केंद्रांवर प्रवेशाची प्रक्रिया राबविणार आहे. संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याकरिता उपलब्ध जागांची माहिती संबंधित महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ११ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, तसेच १७ ते १९ जानेवारी या कालावधीत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top