स्त्री शिक्षण गौरव दिवस उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्री शिक्षण गौरव दिवस उत्साहात
स्त्री शिक्षण गौरव दिवस उत्साहात

स्त्री शिक्षण गौरव दिवस उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः भारतात स्त्री शिक्षणाची पहाट सावित्रीबाई, महात्मा जोतिराव फुले आणि फातिमा शेख यांच्यामुळे झाली. त्यांच्या या कार्यामुळे १ जानेवारी १८४८ साली मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली. आज या कार्याला (ता. १) १७३ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मुलींच्या पहिल्या शाळेचा स्थापना दिवस व स्त्री शिक्षण गौरव दिवस सार्वजनिक स्मारक निर्माण समितीने साजरा केला. या वेळी हा दिवस स्त्री शिक्षण गौरव दिन म्हणून साजरा करावा करावा, अशी मागणी समितीने केली.

भिडे वाडा येथे समितीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस उपनिरीक्षक कीर्ती म्हस्के यांच्या हस्ते गौरव फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी फुले दांपत्याच्या लढ्याची आठवण ‘अभिव्यक्ती’चे तरुण कार्यकर्ते मोनाली चंद्रशेखर अर्पणा, कल्याणी दुर्गा रवींद्र, मंगल निकम, उजमा खान यांनी ‘सावू पेटती मशाल, सावू आग ती जलाल, सावू शोषितांची ढाल, सावू मुक्तीचं पाऊल’ या गाण्यातून मांडली. या वेळी समितीचे निमंत्रक नितीन पवार, महात्मा फुले प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर, रिक्षा पंचायतीचे विजय जगताप, विशाल बागूल, ‘लोकायत’चे अजित पेंटर आदी उपस्थित होते. सुनंदा साळवे यांनी आभार मानले. समारोप महात्मा फुले रचित अखंडाने झाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top