रायगड किल्ला व परिसर विकासाची कामे गतीने होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड किल्ला व परिसर विकासाची कामे गतीने होणार
पुणे विभागाला ८१ कोटींचा आर्थिक फटका

रायगड किल्ला व परिसर विकासाची कामे गतीने होणार

sakal_logo
By
रायगड किल्ल्याची विकास कामे गतीने होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही महाड, ता. १२ (बातमीदार) : महाविकास आघाडीचे सरकार रायगड किल्ला आणि परिसर विकासाचे काम पूर्णत्वाला नेणार आहे. किल्ला परिसरातील २१ गावांचा विकास आणि स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचा पवार यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही ग्वाही दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार संभाजी राजे, खासदार सुनील तटकरे, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी अधिकारी उपस्थित होते. रायगड संवर्धना अंतर्गत पर्यटन आराखडा प्राधिकरणाची कामे गतीने व्हावीत, कामांची गुणवत्ता, दर्जा कायम राखावा, या विकासकामांना गती मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, पर्यटन विभाग, पुरातत्त्व संशोधन विभाग, जिल्हा प्रशासनाने समन्वय राखून प्राधिकरणाला कामकाजात सहकार्य करावे. तसेच या प्राधिकरणाला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी घडविलेला इतिहास हा प्रेरणादायी आहे. या इतिहासात रायगड आणि परिसराला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे रायगड किल्ल्याचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी प्राधिकरणाला निधी कमी पडू देणार नाही, असे ते म्हणाले. ..... ‘शिवसृष्टीची उभारणी शास्त्रोक्त पद्धतीने करा’ प्राधिकरणाच्या कामकाजात कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीचा विनियोग पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि प्राधिकरणाने समन्वयाने करावा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. राजमाता जिजाऊ वाडा, समाधीचे संवर्धन, जतन करण्याचे काम, शिवसृष्टी उभारणी अशी नियोजित सर्व कामे शास्रोक्त पद्धतीने करावीत. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करावे, अशा सूचना त्यांनी संबंधितांना या बैठकीत दिल्या. ....... फोटो - रायगड किल्ला व पर्यटन विकास आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना अजित पवार व संबंधित अधिकारी.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top