ग्रामीण भागातील बससेवेवर ताण

ग्रामीण भागातील बससेवेवर ताण

पुणे, ता. २ : पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) ग्रामीण भागातील १० मार्गावर बस सेवेवरील एसटी संपामुळे ताण येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने एसटी बस सेवा बंद आहे. परिणामी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गर्दीची दखल घेऊन पीएमपी प्रशासनाने बसची संख्या वाढवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सासवड, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, कारेगाव, तळेगाव आदी मार्गावर दैनंदिन कामांसाठी तसेच कामानिमित्ताने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गर्दी वाढली असून बसण्यासाठी जागा देखील मिळत नाही. दिवसभर काम करून निवांत घरी जाता यावे, अशी अपेक्षा असते. मात्र गर्दी एवढी असते की कधी कधी उभे राहण्यासही जागा मिळत नाही.


पुन्हा कोरोनाचा प्रभाव वाढला आहे. त्यात ओमिक्रॉनचा भीती असतानाही आम्ही जीव मुठीत धरुन प्रवास करतो आहोत. एकीकडे सरकार सांगते की गर्दी टाळा. तर दुसरीकडे बसमधील गर्दीला रोजच सामोरे जावे लागत आहे. पीएमपीने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, बसची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
लक्ष्मी झेंडे, प्रवासी, हडपसर

पीएमपीकडे मर्यादित गाड्या आहेत. तसेच मनुष्यबळही कमी पडते आहे. पीएमपीच्या १० ग्रामीण मार्गावर १५० हून अधिक बस धावतात. या पलीकडे अधिक बस वाढवणे शक्य होणे अवघड आहे. एसटी संपाचा हा परिणाम आहे.
दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.

बसची संख्या कमी असल्याने गैरसोयीचे ठरत आहे, गर्दीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. रांजणगाव या मार्गावर बस संख्या वाढवावी. या मार्गावर कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. किमान १० मिनीटांनी बसावी.
- श्रीकांत भोसले, प्रवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com