पुण्यात रेमडेसिव्हिरचे २८ हजार इंजेक्शन उपलब्ध

पुण्यात रेमडेसिव्हिरचे २८ हजार इंजेक्शन उपलब्ध

पुणे, ता. ३ : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरीही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. मात्र, शहरात सध्या २८ हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) सोमवारी देण्यात आली.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना मोठ्या प्रमाणावर लहान ‘कोविड सेंटर’ला शहरात व ग्रामीण भागात मान्यता दिली होती. डॉक्टरांच्या चिठ्ठीवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी वाढली होती. त्यामुळे गेल्यावर्षी एप्रिलपासून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या इंजेक्शनच्या वाटपावर जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षामार्फत नियंत्रण ठेवण्यात आले. इंजेक्शनचा उपलब्ध होणारा साठा आणि वितरणाची व्यवस्था उभारली. या कक्षातर्फे एक लाख ८७ हजार ७२४ इंजेक्शनचा पुरवठा केला. मागणीच्या तुलनेत हा पुरवठा पुरेसा असल्याचे ‘एफडीए’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

यासंदर्भात ‘एफडीए’चे सहायक आयुक्त दिनेश खिंवसरा म्हणाले, ‘‘रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक साठा असल्याने गेल्या वर्षी १९ जूनपासून हे इंजेक्शन खुल्या बाजारात उपलब्ध केले आहे. सध्या बाजारात २८ हजार इंजेक्शन्सचा साठा उपलब्ध आहे.’’ शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली, तरीही मुबलक प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टोसिलिझुमॅब इंजेक्शन...
कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी हे इंजेक्शन वापरण्यात आले, त्याचाही तुटवडा गेल्यावर्षी पुणे शहरात होता. त्यामुळे या इंजेक्शनचे वितरणही नियंत्रण कक्षेमार्फत करण्यात आले. आतापर्यंत ४०० मिलिग्रॅमच्या २३२ आणि ८० मिलिग्रॅमचे दोन हजार ३१५ इंजेक्शन वापरण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com