सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी मोठे योगदान ः श्रद्धा कुंभोजकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी
मोठे योगदान ः श्रद्धा कुंभोजकर
सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी मोठे योगदान ः श्रद्धा कुंभोजकर

सावित्रीबाई फुले यांचे समाजासाठी मोठे योगदान ः श्रद्धा कुंभोजकर

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : ‘‘कोणताही विचार हा स्वीकारण्याआधी किंवा नाकारण्याआधी मानवकेंद्री विचारातून त्याची चिकित्सा सावित्रीबाई फुले या करत होत्या. कोणतीही गोष्ट स्वत:च्या विचाराने, विवेकाने त्या ठरवत होत्या. फक्त महिला म्हणून नाही, तर व्यक्ती म्हणून त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले आहे,’’ असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त डॉ. कुंभोजकर यांचे ‘सावित्रीची वाणी ध्यानी आणा’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. अंजली कुरणे, महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. उमराणी यांनीही विचार मांडले. कार्यक्रमात पाली भाषा विभागातील संशोधक विद्यार्थी मिलिंद वाघमारे याने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. तसेच मोगल जाधव यांनी लिहिलेल्या ‘सावित्रीबाई जोतिराव फुले कार्य आणि कर्तृत्व’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top