सरदार पटेल रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरदार पटेल रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
सरदार पटेल रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

सरदार पटेल रुग्णालयात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत असताना केंद्र सरकारच्या वतीने १ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सोमवारी या वयोगटासाठी लसीकरणाची सुरवात करण्यात आली. तर लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी सुमारे ८० मुलांचे लसीकरण केले.
दरम्यान सोमवारपासून (ता. १०) या रुग्णालयात ६० वर्षावरील वयोगटातील लोकांचे आणि फ्रंटलाइन वर्कर यांच्यासाठी प्रीकॉशन डोस (बूस्टर डोस) देण्यास सुरवात होणार आहे. त्यात सहव्याधी असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दुसरा डोस घेऊन ९ महिने म्हणजेच ३९ आठवडे पूर्ण झालेल्या लोकांना प्रीकॉशन डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top