weapons
weaponssakal

पुणे : घातक शस्त्रे सहज उपलब्ध!

दहशत पसरविण्यासाठी सर्रास वापर; पोलिसांचे दुर्लक्ष

पुणे : आपापसांतील खुन्नस काढण्यासाठी किरकोळ कारणावरून होणाऱ्या भांडणांच्या रागातून कुठलीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या तरुणांनी एका तरुणावर तलवारी, कोयत्याने वार करून त्याचा खून केला. याच पद्धतीने शहराच्या वेगवेगळ्या भागांत सातत्याने खून, खूनाचा प्रयत्न, दहशत माजविण्याच्या घटना घडत आहेत. अशा घटनांसाठी या तरुणांकडे तलवारी, कोयते, पालघनापासून ते पिस्तुलापर्यंतची हत्यारे मुलांना सहज उपलब्ध होत आहेत. घातक शस्त्रे सर्रासपणे उपलब्ध होत असूनही, पोलिसांकडून मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची स्थिती आहे. मागील वर्षभरात पोलिसांनी ८० पिस्तूल, ३१४ कोयते, ८६ तलवारींसह विविध प्रकारची सुमारे साडेसहाशे हत्यारे जप्त केली आहेत.(weapons seized by police)

weapons
भारतात ओमिक्रॉनचा पहिला बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

तलवारी, कोयते येतात कुठून?
शहरामध्ये यापूर्वी जुना बाजार, शेती आणि बांधकाम साहित्याच्या दुकानांमध्ये अवजारांची विक्री होत होती. मात्र, पोलिसांमुळे आता कोयत्यांची विक्री होत नाही. तरीही शहराच्या वेगवेगळ्या भागांत छुप्या पद्धतीने कोयता, तलवारी अशी हत्यारे मिळतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती अधिकच्या दराने त्या खरेदी करतात. ग्रामीण भागामध्ये शेतीची अवजारे बनविणाऱ्या ठरावीक व्यक्तींकडून कोयते, तलवारी यांसारखी हत्यारे बनवून घेतली जातात. त्यानंतर दलालांमार्फत ही हत्यारे शहरात पोचवून त्याची संबंधित तरुणांना विक्री केली जाते.

weapons
'बुली बाई' नंतर हिंदू महिला टार्गेट; सरकारकडून टेलिग्राम चॅनल ब्लॉक

बॅलेस्टिक रिपोर्टच्या भितीपोटी तलवारी, कोयत्यांचा वापर
गुन्हेगारांना वेगवेगळ्या मार्गाने पिस्तुलासारखे शस्त्र सहज उपलब्ध होते. परंतु, त्याचा वापर केवळ धमकावण्यापुरताच केला जातो. खुनाचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून संबंधित गुन्ह्याचा बॅलेस्टिक रिपोर्ट न्यायालयात सादर केला जातो. परिणामी, गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी तो सबळ पुरावा ठरतो. त्यामुळे गुन्हेगारांकडून पिस्तुलाचा थेट वापर करण्याचे टाळून तलवारी, कोयता यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. (Pune news)

weapons
‘रॅलींना घाबरू नका; कोरोनाशी लढण्यासाठी पुरेशी संसाधने’

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधून पिस्तुलाची तस्करी
मुंबई, बीड यांसारख्या शहरांबरोबरच उत्तर प्रदेश, बिहारमधील काही शहरे, गावांमधून पिस्तूल विक्रीसाठी पुण्यात आणले जाते. यूपी, बिहारशी संपर्क असणाऱ्या दलालांमार्फत नवख्या तरुणांना किंवा गुन्हेगारांना ४० हजार ते एक लाखांपर्यंत पिस्तूल मिळते. गुन्हेगारांचा थेट यूपी, बिहारमधील विक्रेत्यांशी संपर्क असल्यास २० ते २५ हजार रुपयांपर्यंत मिळते. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अनेकदा ‘कॅश’ ऐवजी ‘ऑनलाइन’ व्यवहार करून पिस्तूल खरेदी केले जाते.

शहरात कोयते तयार करू दिले जात नाहीत तसेच त्यांची विक्रीही करू दिली जात नाही. जुना बाजार किंवा अन्य ठिकाणी होणारी विक्री आता बंद आहे. सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी परिसरात हत्यारांची विक्री होते. त्यानुसार, संबंधित जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला आहे. मागीलवर्षी ७० ते ७५ पिस्तूल जप्त केले आहेत. पिस्तुलची विक्री करणाऱ्यांवरही यापूर्वी कारवाई केलेली आहे.
- श्रीनिवास घाडगे, पोलिस उपायुक्त (गुन्हे)

घातक शस्त्र बाळगण्याची कारणे
- गंभीर गुन्हा करण्यासाठी
- दादागिरी, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी
- आकर्षण किंवा हौस पिस्तूल बाळगण्याचे ‘फॅड’
- गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी

मागील वर्षभरातील हत्यारांसंबंधीचे गुन्हे
दाखल गुन्हे उघड गुन्हे अटक आरोपी

६८९ ६८९ ८५२

weapons
Delhi-Mumbai Expresswayवरून इंदूर-देवास-उज्जैनला जाता येणार

पोलिसांनी जप्त केलेली हत्यारे
पिस्तूल - ८०
कोयते - ३१४
तलवार - ८६
चाकू/सुरा - १२
सत्तूर - ११
पालघन - ८
चॉपर - ५
गुप्ती - ४
इतर हत्यारे - ५२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com