अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

अरिहंत जागृती मचाची कार्यकारिणी जाहीर
पुणे ः अरिहंत जागृती मंचाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, राजेंद्र सुराणा यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शांतीनाथ जैन व विजय पारख यांची निवड करण्यात आली आहे. जैन धर्माचे तत्त्व अबाधित राहावे आणि जनजागृतीसाठी ही संस्था स्थापित केल्याचे अध्यक्ष सुराणा यांनी सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सचिवपदी संतोष भन्साळी, सहसचिवपदी सुनिल गांधी आणि कोषाध्यक्षपदी नितीन शहा यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
फोटो ः हार्ड

लुई ब्रेल यांची जयंती साजरी
पुणे ः कोकणस्थ परिवाराच्या वतीने दृष्टिहीनांसाठीच्या ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती साजरी करण्यात आली. पंडित नेहरू स्टेडियमवर यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रीयकृत बॅंकेच्या लेखनिक पदावर निवड झालेले विद्यार्थी माधव बिरादार यांचा उद्योजक राजीव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. या वेळी बाळासाहेब साने अध्यक्षपदी होते. समीर साने यांनी स्वागत, पराग गानू यांनी प्रास्ताविक, तर सुनील नेवेकर यांनी अभार मानले. प्रवीण गुजराथी यांनी सूत्रसंचालन केले.

व्हीके ग्रुपला बेस्ट एम्प्लॉयर पुरस्कार
पुणे, ता. ः शहर नियोजन, आर्किटेक्ट क्षेत्रात कार्यरत व्ही. के. ग्रुपला बेस्ट एम्प्लॉयर ब्रॅंड ॲवॉर्ड २०२१ प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील वर्ल्ड एचआरडी काँग्रेस आणि ग्लोबल रियल इस्टेट आयोजित काँग्रेसमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रुपच्या कार्यान्वयन विभागाच्या अपूर्वा कुलकर्णी आणि दीपाली बोकील यांनी डॉ. रिटा जयरथ यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top