कालीचरण महाराजाला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालीचरण महाराजाला पोलिस कोठडी
कालीचरण महाराजाला पोलिस कोठडी

कालीचरण महाराजाला पोलिस कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : समाजात तेढ निर्माण होईल असे भडकावू आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज याला न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. ६) पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. शेख यांनी हा आदेश दिला. कालीचरण महाराज याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यात आरोपीने चिथावणीखोर भाषण करण्यामागे कोणत्या व्यक्ती किंवा संघटनांचा सहभाग आहे? गुन्हा घडल्यावर फरार कालावधीत कालीचरणने कोठे वास्तव्य केले, तो कोणाच्या संपर्कात होता, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी कालीचरण महाराज याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. कालीचरण महाराज याच्या वतीने ॲड. अमोल डांगे यांनी कामकाज पाहिले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top