विमानतळ परिसरातील टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळ परिसरातील टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई
विमानतळ परिसरातील टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

विमानतळ परिसरातील टोळीवर ‘मोका’ अंतर्गत कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापतीसह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विमानतळ परिसरातील सराईत गुन्हेगार व त्याच्या टोळीविरुद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (मोका) कारवाई केली आहे. ‘मोका’अंतर्गत झालेली आतापर्यंतची ही ६४ वी कारवाई आहे.

ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (वय २४, रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्यासह त्याचे साथीदार शंभु बालाजी कावळे (वय २२), कर्ण भाऊसाहेब राखपसरे (वय २२, दोघेही रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) यांच्यासह टोळीवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. आल्हाटवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आल्हाट हा त्याच्या साथीदारांसह संघटीतपणे गुन्हेगारी कृत्य करीत होता. यापुर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. त्यानंतरही त्यांच्याकडून गुन्हे केले जात होते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन विमानतळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी आल्हाट, कावळे व राखपसरे या गुन्हेगारांच्या टोळीवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त रोहीदास पवार यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविला. त्यानुसार, त्यांनी प्रस्तावास मंजुरी दिली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top