विद्यार्थ्यांनी स्वतःमधील अभिव्यक्ती शोधावी ः काशीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील अभिव्यक्ती शोधावी ः काशीकर
विद्यार्थ्यांनी स्वतःमधील अभिव्यक्ती शोधावी ः काशीकर

विद्यार्थ्यांनी स्वतःमधील अभिव्यक्ती शोधावी ः काशीकर

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे, ता. ५ ः विद्यार्थ्यांनी स्वतःची अभिव्यक्ती शोधत स्वतःचा उत्कर्ष साधला पाहिजे. इतरांपेक्षा आपल्यातील वेगळेपणा हेरून त्या कलागुणांना वाव देणे आजच्या काळात महत्त्वाचे आहे, असे मत वृत्तनिवेदिका आणि लेखिका वसुंधरा काशीकर भागवत यांनी व्यक्त केले.
मावळातील तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे उपस्थित होते.
काशीकर म्हणाल्या, ‘‘माणूस म्हणून माणसाशी जोडून घेण्यासाठी भाषेइतके प्रभावी माध्यम आज जगात उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांनी भाषेबद्दल मनात न्यूनगंड बाळगू नये. आपल्याला जी भाषा येते, त्या भाषेतील चांगली कौशल्ये आत्मसात करून भाषाक्षेत्रात चांगले काम करणे गरजेचे आहे.’’ भाषा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामाच्या संधी आहेत. परंतु, कौशल्ययुक्त मनुष्यबळ उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन डॉ. संदीप कांबळे यांनी केले तर प्रा. सत्यजित खांडगे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top