वारजे येथे भरदिवसा घरफोडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारजे येथे भरदिवसा घरफोडीत
वारजे येथे भरदिवसा घरफोडीत

वारजे येथे भरदिवसा घरफोडीत

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : चोरट्यांनी भरदिवसा सोसायटीतील एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरातील अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरुन नेले. ही घटना बुधवारी दुपारी साडे बारा वाजता वारजे येथील डुक्करखिंड परिसरात घडली.
याप्रकरणी एका ६४ वर्षीय नागरिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डुक्करखिंडीजवळील गौरंग सोसायटीत सदनिका आहे. बुधवारी दुपारी ते वैयक्तिक कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. दरम्यान, चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून घरातील कपाटामध्ये ठेवलेली ७० हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा अडीच लाख रुपये किंमतीचे ऐवज चोरुन नेला. ते काही वेळाने घरी परतले. तेव्हा घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानंतर त्यांनी तत्काळ वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top