आगप्रकरणी आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आगप्रकरणी आरोपीच्या 
पोलिस कोठडीमध्ये वाढ
आगप्रकरणी आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ

आगप्रकरणी आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये वाढ

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : शिवणे भागातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये उभा केलेल्या वाहनांना आग लावल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत २७ जानेवारीपर्यंत वाढ केली. शामकुमार सितारशरण ठाकूर (वय २७, रा. नऱ्हे, मुळ रा. बिहार), असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत आदित्य सुरेश कोरडे (वय २५, रा. शिवणे) याने फिर्याद दिली. त्यानुसार उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिवणेतील शिवकमल नगरी सोसायटीच्या ‘बी विंग’ इमारतीखालील पार्किंगमध्ये गेल्या १३ जानेवारी रोजी पहाटे हा प्रकार घडला. आगीत १३ दुचाकी, दोन रिक्षा आणि एक सायकलचे नुकसान झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top