कोरोनाची लागण होण्याचे सोसायट्यांत मोठे प्रमाण औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड भागात बहुतांश रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची लागण होण्याचे सोसायट्यांत मोठे प्रमाण 
औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड भागात बहुतांश रुग्ण
कोरोनाची लागण होण्याचे सोसायट्यांत मोठे प्रमाण औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड भागात बहुतांश रुग्ण

कोरोनाची लागण होण्याचे सोसायट्यांत मोठे प्रमाण औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड भागात बहुतांश रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः दाट लोकवस्ती, लहान घरे असलेल्या झोपडपट्टीच्या भागात कोरोनाच्या संक्रमणाचा धोका असला तरी प्रत्यक्षात या भागापेक्षा सोसायट्यांमध्येच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण मोठे असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क, हडपसर, कोथरूड या भागातच बहुतांश रुग्ण आहेत. गेल्या पाच दिवसात सर्वाधिक १२९७ रुग्ण औंध, बाणेर भागात आढळले आहेत तर सर्वात कमी १४० रुग्ण भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील लोहियानगर, कासेवाडी, रविवार पेठ, महात्मा फुले पेठ यासह इतर भागातील नागरिकांना मोठ्याप्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला होता. ओमिक्रॉनचा विषाणू वेगात पसरत असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही याच भागात जास्त प्रसार होईल, अशी शक्यता होती. त्यामुळे महापालिकेने तयारी सुरू केली. पण शहरात जशी रुग्णसंख्या वाढत असली तरी भवानी पेठ, कसबा पेठ, कोंढवा, येरवडा परिसरात साथ नियंत्रणात आहे.
तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक २७५७ रुग्णांची नोंद ७ जानेवारीला शहरात नव्याने झाली, त्यापैकी बहुतांश रुग्ण हे औंध, हडपसर, नगर रस्ता, कोथरूड या भागातील सोसायट्यांमधील रहिवासी होते. तर झोपडपट्टीचा बहुतांश भाग असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत रुग्णसंख्या ही १००च्या आतच असल्याचे समोर आले. यात प्रामुख्याने जनता वसाहत, भवानी पेठ, ताडीवाला रस्ता, पाटील इस्टेट, लोहियानगर या भागाचा समावेश आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली असली तरी ती झोपडपट्टी किंवा वस्ती भागात नियंत्रणात आहे. सोसायट्यांच्या परिसरात मात्र, साथ वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासूनच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास झोपडपट्टी, वस्ती असलेल्या भागात कोरोनाची साथ नियंत्रणात आहे. पण, सोसायट्यांचे प्रमाण जास्त असलेल्या भागात वेगात रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शहरातील सर्वच नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. संजीव वावरे,
सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका


क्षेत्रीय कार्यालयनिहाय रुग्णसंख्या
(३ ते ७ जानेवारी)
क्षेत्रीय कार्यालय - रुग्णसंख्या
औंध बाणेर - १२९७
भवानी पेठ - १४०
बिबवेवाडी - ४३१
धनकवडी-सहकारनगर - ४८८
ढोले पाटील रस्ता - ४८८
हडपसर - १०३१
कसबा-विश्रामबाग - २३५
कोंढवा-येवलेवाडी - ३९९
कोथरूड-बावधन - ८३२
नगर रस्ता - १०२८
शिवाजीनगर - ४४६
सिंहगड रस्ता - ३४२
वानवडी - ३७१
वारजे-कर्वेनगर -५२६
येरवडा - ३४०

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top