जिल्ह्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार ६७ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात दिवसभरात आढळले
कोरोनाचे ३ हजार ६७ नवे रुग्ण
कृतज्ञतेचे मूल्य डॉ. कदम यांनी आयुष्यभर जपले ः जोशी

जिल्ह्यात दिवसभरात आढळले कोरोनाचे ३ हजार ६७ नवे रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात ५ हजार १७२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. यात पुणे शहरातील ३ हजार ६७ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २८ हजार २०१ झाली असून विविध रुग्णालयांमध्ये १ हजार ५०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अन्य २६ हजार ६९४ जण गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार २७६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६००, नगरपालिका हद्दीतील ११९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११० रुग्णांचा समावेश दिवसभरात पुण्यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, दिवसभरात १ हजार ४७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील कोरोनामुक्तांत पुणे शहरातील ८५७, पिंपरी चिंचवडमधील २३०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २८७, नगरपालिका हद्दीतील ७४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २३ जण आहेत. दिवसभरात एकूण ३० हजार ५९० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये पुणे शहरातील १५ हजार १३९ चाचण्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top