शहरात पहाटे जाणवू लागला गारठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात पहाटे जाणवू लागला गारठा
शहरात पहाटे जाणवू लागला गारठा

शहरात पहाटे जाणवू लागला गारठा

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट दिसून येत आहे. त्यामुळे आता पहाटे गारठा जाणवू लागला आहे. दरम्यान पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याने किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शहरात शनिवारी १३.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यातील विविध भागांमध्ये पहाटे धुक्याची चादर पसरली होती. मागील दोन दिवसांपासून पहाटे थंडीत वाढ होत असली तरी दिवसा मात्र उन्हाचे चटके अनुभवायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस शहर व परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता असून किमान तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची शक्यता आहे. किमान तापमान हे १० ते १२ अंश दरम्यान नोंदले जाऊ शकते. नव्या वर्षाच्या सुरवातीपासून शहरात थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र आता थंडी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या पावसासाठी पोषक वातावरण असून शनिवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. दरम्यान रविवारी (ता. ९) कोकणात तुरळक तर विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. शनिवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३३.२ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्‍वर येथे १२.७ अंश सेल्सिअस इतकी झाली. तर पुढील चार दिवस विदर्भात मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top