निधन वार्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वार्ता
निधन वार्ता

निधन वार्ता

sakal_logo
By

संभाजी गायकवाड
पुणे ः कर्वेनगर येथील रहिवासी संभाजी ज्ञानोबा गायकवाड (वय ६९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. ‘सकाळ’च्या उरुळी देवाची येथील प्रिंटिंग युनिटमधील पार्सल विभागात ३४ वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले होते.
PNE22S34773

मनोहर दीक्षित
पुणे ः जुन्या पिढीतील प्रसिद्ध स्थापत्य अभियंते मनोहर माधव दीक्षित (वय ८३) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. दीक्षित अँड आपटे व दीक्षित अँड असोसिएट्स या भागीदारी संस्थांमधून त्यांनी पुण्यातील एनडीएचे रुग्णालय, बालभारती, आरबीआय स्टाफ ट्रेनिंग कॉलेज, ज्ञानेश्‍वर समाधी मंदिराचे महाद्वार, औरंगाबाद येथील आयटीडीसीचे पंचतारांकित हॉटेल, देवळाली येथील आर्मी परेड ग्राउंड अशा अनेक प्रसिद्ध वास्तूंची निर्मिती केली. स्थापत्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्तींना त्यांनी ‘माधव-मंदाकिनी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. महर्षी सद्गुरू अण्णासाहेब पटवर्धन समाधी मंडळाचे ते विश्वस्त होते.
PNE22S34774

वसंत गोविलकर
पुणे ः सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील रहिवासी वसंत महादेव गोविलकर (वय ६६) यांचे नुकतेच निधन झाले. जलसंपदा विभागातून ते निवृत्त झाले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व तीन भाऊ असा परिवार आहे.
PNE22S34775

हिरालाल शिंगवी
पुणे ः धनकवडी येथील कार्यकर्ते हिरालाल शिंगवी (वय ६४) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी व दोन मुलगे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सक्रिय कार्यकर्ते वृषभ शिंगवीचे ते वडील होत.
PNE22S34776

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top