विमानतळासाठी सामूहिक प्रयत्न करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमानतळासाठी सामूहिक प्रयत्न करणार
विमानतळासाठी सामूहिक प्रयत्न करणार

विमानतळासाठी सामूहिक प्रयत्न करणार

sakal_logo
By

पुणे, ता. ८ ः शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चासत्र आयोजित करणाऱ्या क्लब ऑफ इन्फ्लुएन्सर पुणेतर्फे पुण्याच्या प्रलंबित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विषयावर शनिवारी (ता. ८) चर्चासत्र आयोजित केले होते. विमानतळाला होणारा प्रचंड विलंब आणि अडथळे याबद्दल सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची सांगोपांग चर्चा व्हावी, या हेतूने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए) यांच्या मुख्यालयात चर्चासत्र घेण्यात आले.
यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून, तर आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष सुधीर मेहता, महासंचालक प्रशांत गिरबाने, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), राजेश पांडे, अमित परांजपे, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘महाराष्ट्र टाईम्स’चे समूह संपादक पराग करंदीकर व इतर मान्यवर उपस्थित होते. शीतल पवार यांनी सूत्रसंचालन केले. गिरबाने यांनी आभार मानले.

कोण काय म्हणाले...
- सुधीर मेहता ः पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्यावश्यक आहे. आधीच यासाठी खूप विलंब झाला आहे. आता अधिक विलंब होऊ नये.
- प्रशांत गिरबाने ः प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ पुण्यासाठीच नव्हे; तर व्यापार आणि शेतीमालाच्यादृष्टीने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
- भूषण गोखले ः नवी जागा अधिक योग्य आणि सुरक्षित आहे. याठिकाणी चार धावपट्ट्या करण्यासाठी अधिकची जमीन अधिग्रहीत करावी.
- गिरीश बापट ः प्रस्तावित पुरंदर विमानतळाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, एअर मार्शल गोखले आणि पुण्याचे लोकप्रतिनिधी यांची लवकरात लवकर बैठक घेऊन अॅक्शन प्लॅन तयार करावा व कामाला गती द्यावी.
- सुप्रिया सुळे ः डिसेंबरमध्ये या संदर्भात दिल्लीत बैठक होणार होती; परंतु बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूमुळे बैठक लांबणीवर पडली. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली याआधी संरक्षण मंत्रालयाबरोबर बैठक झाली. पुढील बैठक लवकरात लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करू.
- मुरलीधर मोहोळ ः या संदर्भात एकत्र काम करायला हवे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी नव्या जागेला परवानगी नाकारली असेल, तर जुन्या जागेची शक्यता कितपत आहे, याची तपासणी करावी.
- अमित परांजपे ः पुणे हे एक्स्पोर्ट, आयटी, स्टार्टअपमध्ये देशात पहिल्या पाच शहरांमध्ये आहे. परंतु, पुण्याला अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ नाही. त्यामुळे पुण्यातील गुंतवणूक कमी होत चालली आहे. तसेच, पुढच्या ३० वर्षांचा विचार करता मुंबई, नवी मुंबई, लोहगाव, पुरंदर आणि अजून २-३ विमानतळांची गरज भासेल.
- चंद्रकांत पाटील ः लोकांचा विश्‍वास मिळविण्यासाठी बाधितांना मोबदला देताना, सरकारला उद्योजकांच्या मदतीने स्थानिकांना रोजगार देण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. नवीन विमानतळ होईपर्यंत सध्याच्या विमानतळावर सोयी-सुविधा वाढविण्यासाठीही प्रयत्न करावेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top