सदाशिव पेठेत तरुणीचा विनयभंग
शहरात दोन दिवसांत दोन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

सदाशिव पेठेत तरुणीचा विनयभंग शहरात दोन दिवसांत दोन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

पुणे, ता. ११ : फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील ‘हेअर स्पा’मध्ये तरुणीचा विनयभंग करण्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (ता. १०) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीचा भररस्त्यावर विनयभंग करण्यात आला. सदाशिव पेठेतील शास्त्री रस्ता परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, शहरात सलग दोन दिवस विनयभंगाच्या घटना घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी पेठेत राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. सोमवारी सकाळी ती मैत्रीणींसमवेत शास्त्री रस्त्यावरून टिळक रस्त्याकडे जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक आलेल्या एका अनोळखी तरुणाने फिर्यादी तरुणीशी अश्लील वर्तन केले. यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले.

दरम्यान, डेक्कन जिमखाना येथील ‘हेअर आर्ट’ या स्पामधील कर्मचाऱ्याने २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (ता. ९) घडली होती. या घटनेनंतर तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला नोटीस बजावली आहे. शहरात असे प्रकार घडू लागल्याने महिला व तरुणींकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

सुरक्षित वातावरण असल्याने राज्याच्या विविध भागातून तरुणी शिक्षणासाठी किंवा स्पर्धा परीक्षेची तयार करण्यासाठी शहरात येतात. परंतु, अशा घटना घडल्यास त्यांच्या मानसिकतेसह अभ्यासावरही परिणाम होतो. यामुळे हे प्रकार करणाऱ्या विकृत व्यक्तींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी.
- मानसी वायदंडे, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी युवती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com