दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक
दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना अटक

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : हातात कोयता असलेल्या तरुणांचा घोळका पाहिल्यानंतर घाबरलेल्या तरुणाचा दुचाकी घसरून अपघात झाला. तरुण खाली कोसळताच टोळक्याने त्यांना मारहाण करून लुटल्याचा प्रकार लेकटाऊनजवळ सोमवारी (ता. १०) रात्री दहाच्या सुमारास घडला आहे. हा प्रकार पाहून नागरिक जमा झाल्यानंतर कोयतेधारी तरुणांनी दहशत निर्माण केली. याप्रकरणी पोलिसांनी अब्दुल मामू शेख (वय १९) आणि तेजस दीपक सणस (वय १९) यांना अटक केली आहे. तर, त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत. याबाबत आनंद दरगडे (वय २९) व त्यांचा मित्र अतुल यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top