loan fraud
loan fraudsakal

कर्जाच्या आमिषाने साडेदहा लाखांचा गंडा

कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला साडेदहा लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

पुणे : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला साडेदहा लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑक्टोबर २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत घडली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी कर्जाबाबत माहिती घेण्यास सुरवात केली. (Loan Fraud Case)

loan fraud
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

दरम्यान त्यांना अनोळखी मोबाईल कमांकवरून फोन आला. त्यांनी तक्रारदारांचा विश्वास संपादन करीत विविध इन्शुरन्स कंपनीत पॉलिसी काढण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पॉलिसी काढल्या. यानंतर तक्रारदारांना कर्ज मिळवून देण्यासाठी तसेच इतर कारणांसाठी पैसे घेतले. तक्रारदाराने त्या व्यक्तीकडे एकूण १० लाख ६२ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी पैसे परत मागितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.(Pune Crime News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com