मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

मिलिंद एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे, ता. १२ : भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे, दीपक नागपुरे आणि मोहन शेटे यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सत्र न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश पी. आर.अष्टुरकर यांनी हा आदेश दिला. या प्रकरणात कालिचरण महाराज याला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत किंवा या आदेशापासून पुढील ६० दिवस दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत किंवा जेव्हा चौकशीसाठी बोलावले जाईल, तेव्हा पोलिस ठाण्यात हजेरी लावावी, तपास यंत्रणांना सहकार्य करावे, पुराव्यात छेडछाड करू नये या अटींवर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात एकबोटे बंधू, नागपुरे व शेटे यांनी अॅड. एस. के. जैन व अॅड. अमोल डांगे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com