‘रॅपिड अँटिजेन’ पॉझिटिव्ह 
आल्यास प्रशासनाला कळावा
अन्न व औषध प्रशासनाची सूचना; डॉक्टरांच्या सूचनांनुसार उपचार घ्यावे

‘रॅपिड अँटिजेन’ पॉझिटिव्ह आल्यास प्रशासनाला कळावा अन्न व औषध प्रशासनाची सूचना; डॉक्टरांच्या सूचनांनुसार उपचार घ्यावे

पुणे, ता. १३ : तुम्ही कोरोना निदानाची रॅपिड अँटिजेन टेस्ट करताय का? करायला काहीच हरकत नाही. पण, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याची माहिती तुमच्या संबंधित भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नक्की द्या, अशी सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली आहे.

शहरासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या दोन लाटांत रुग्णालयात जाऊन अँटिजेन आणि ‘आरटी-पीसीआर’ या कोरोनानिदान चाचण्या करणाऱ्यांवर नागरिकांचा भर होता. कोरोनाच्या या उद्रेकात आता घराच्या घरी स्वतः चाचणी करता येईल, असे तंत्र विकसित झाले आहे. त्यासाठी ‘रॅपीड अँटिजेन टेस्ट किट’ व ‘होममेड टेस्ट किट’ बाजारात सहजतेने उपलब्ध आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या किटची मागणी वेगाने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त एस. बी. पाटील यांनी या सूचना दिल्या आहेत.

रॅपिड अँटिजेन टेस्ट किटचा वापर करून पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांनी विलगीकरणात राहावे. तसेच, रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हे किट वापरून रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी किंवा जवळच्या महापालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांना ही माहिती कळवावी, असेही पाटील यांनी सांगितले.

रॅपिड अँटिजेन किट खरेदी करणाऱ्या ग्राहकाची संपूर्ण माहिती नोंदवून घेण्याची सूचनाही पाटील यांनी औषध विक्रेत्यांना दिली आहे. किट खरेदी करणाऱ्या ग्राहकाचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, विक्री केलेल्या किटचा तपशिल आदींची सविस्तर नोंद करावी, असे सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

रॅपिड अँटिजेन टेस्ट किट खरेदी सर्व औषध विक्रेत्यांनी ग्राहकांचा आधार कार्ड क्रमांक नोंदवून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच, ग्राहकांनी आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्यास या किटवरचा ‘क्युआर कोड’ स्कॅन करून त्याची माहिती सरकारी यंत्रणेमध्ये नोंदवता येते. औषध विक्रेत्यांनी ही माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी.
-अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com