विविध संस्थांकडून दारू विक्रीच्या निर्णयाला विरोध

विविध संस्थांकडून दारू विक्रीच्या निर्णयाला विरोध

वाइन विक्रीच्या निर्णयाविरोधातील
स्वाक्षरी मोहीमला पुण्यात प्रतिसाद
पुणे, ता. ३० : मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या निर्णयाचा विरोध करण्यासाठी आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र आणि शहर भाजप एनजीओ आघाडीच्यावतीने स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. शहरातील अनेक नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला.

माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, दत्तात्रेय सोनार, संजय हिरवे, जयपाल दगडे, संतोष पटवर्धन, जयंत अहिरे, प्रमोद शेळके, विवेक राजगुरू, विजय शिंदे, जयश्री वायदंडे, सुयोग लाड, प्रदीप खरसे, भूषण जगदाळे, गणेश शारंगधर, अपर्णा कुऱ्हाडे, सुजित गोटेकर आदी या वेळी उपस्थित होते.


शाहीर मावळे सरकारला पुरस्कार परत करणार
पुणे, ता.३० : राज्य सरकारने मॉल व सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा निषेध करण्यासाठी ‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी’चे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार’ राज्य सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला. व्यसनमुक्तीबाबत केल्या कार्याबद्दल त्यांना सरकारकडून हा पुरस्कार मिळाला आहे. पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुरस्काराचे सन्मानचिन्ह जिल्हाधिकाऱ्यांना पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी संगीता मावळे, महादेव जाधव, नगरसेवक योगेश समेळ, मंगलमूर्ती औरंगाबादकर, संजय कोंडे, अनिल दिवाणजी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com