
फळे, भाजीपाल्यातील ‘फ्रोजन’ तंत्रज्ञान
पुणे, ता. ३१ ः शेतमाल साठवणुकीतील महत्त्वाच्या फ्रोजन तंत्रज्ञानाचा अतिशय वेगाने वापर होत आहे. त्यामुळे नाशवंत फळे भाजीपाला अधिककाळ साठवून त्याची टिकवणक्षमता वाढविता येते. हा व्यवसाय करण्यासाठी भरपूर वाव असून याबाबत माहिती देणारी दोन दिवसीय विकेंड कार्यशाळा १२ आणि १३ फेब्रुवारीला आयोजिली आहे. यात फ्रोजन तंत्रज्ञानाची ओळख, यातील ट्रेन्डस, व्यवसाय संधी, पायाभूत सुविधा, मशिनरी, प्रक्रिया, पॅकेजिंग, स्टॅच्युटरी व रेग्युलेटरी रिक्वायरमेंट, एफएसएसएआय, हॅसेप, हायजिन व सॅनिटेशन, प्रॉडक्ट रेंज व संधी इ.विषयी नामवंत तज्ज्ञ व सल्लागार मार्गदर्शन करणार आहेत. प्रति व्यक्ती शुल्क ३५०० रुपये.
संपर्क ः ७६६६२३९४८७
दर्जेदार ऊस उत्पादनासाठी
अन्नद्रव्य व्यवस्थापन
ऊस पिकाचे दर्जेदार व अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. योग्य अन्नद्रव्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो. याविषयी एकदिवसीय कार्यशाळा १२ फेब्रुवारीला आयोजिली आहे. यात जमिनीचे आरोग्य व संतुलित पीक पोषण, सेंद्रिय खत व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, भू-सुधारकांचा वापर, अन्नद्रव्यांची बीजप्रक्रिया, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर तसेच प्रमुख व दुय्यम अन्नद्रव्यांचा वापर इ.विषयी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रति व्यक्ती शुल्क १२०० रुपये.
संपर्क ः ७६६६२३९४८७
कलम प्रक्रिया,
परसबाग व्यवस्थापन
हिवाळ्यातील वातावरण कलम करण्यास अनुकूल असते. कलमाचे एकूण सहा प्रकार असून ते कसे करतात, याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारी तसेच परसबागेच्या व्यवस्थापनाची माहिती देणारी कार्यशाळा ६ फेब्रुवारीला आयोजिली आहे. कार्यशाळेत छाट कलम, गुटी कलम, भेट कलम, डोळा भरणे, पाचर कलम, कोटा कलम कसे करावे याच्या प्रात्यक्षिकाविषयीची माहिती तसेच परसबाग व्यवस्थापनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क ः ९८८१०९९७५७
(वरील सर्व कार्यशाळांचे ठिकाण ः एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे)
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..