जिल्ह्यात १५ दिवसांत लक्ष्यवेध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात १५ दिवसांत
लक्ष्यवेध!
जिल्ह्यात १५ दिवसांत लक्ष्यवेध!

जिल्ह्यात १५ दिवसांत लक्ष्यवेध!

sakal_logo
By

पुणे, ता. ५ : पुणे जिल्ह्यातील १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमधूनही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये जिल्ह्यातील या वयोगटाचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
देशात १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाला ३ जानेवारीपासून सुरवात झाली. पुणे जिल्ह्यातील पाच लाख ३३ हजार ६२२ मुला-मुलींना या अंतर्गत लस देण्याचा उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यापैकी पहिल्या दोन दिवसांमध्ये ४४ हजार ७०० मुलांनी लस घेतली. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १५० लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यापैकी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही काही केंद्र आहेत. अर्थात, त्यासाठी तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली. त्याच आधारावर तेथे केंद्र सुरू करण्यात आले आहे.’’
जिल्ह्यात पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये लसीकरणाचा उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कारण, या मुलांना अवघ्या २८ दिवसांनंतर दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. मुलेही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद देत आहेत. लसीचा मुबलक पुरवठा असल्याने हे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वासही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोणतीही लस नव्हती. त्यामुळे या वयोगटाला कोरोना प्रतिबंध करता येईल, असे कोणतेही संरक्षण नव्हते. भविष्यात शाळा-महाविद्यालये नियमित सुरू ठेवण्यासाठी या वयोगटाचे लसीकरण आवश्यक आहे.
- डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक (वैद्यकीय), पुणे परिमंडळ, सार्वजनिक आरोग्य विभाग

पुणे जिल्ह्याचे लक्ष्य
- ५ लाख ३३ हजार ६२२
- ३ आणि ४ जानेवारीला झालेले लसीकरण : ४४ हजार ७०० लसीकरण
- एकूण लसीकरण केंद्रे १५०
- १५० पैकी ५० शाळा-महाविद्यालयांमध्ये केंद्र
- उर्वरित शंभर नियमित लसीकरण केंद्रे
- सर्व मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येते आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top