कोरोनानंतर तिसऱ्या दिवशीही 
रुग्णसेवेमध्ये हजर होता येणार 
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

कोरोनानंतर तिसऱ्या दिवशीही रुग्णसेवेमध्ये हजर होता येणार आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे, ता. १० : देशात कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची कोणतीही लक्षणे सलग तीन दिवस नसतील, तर आरोग्य कर्मचारी आता अवघ्या तिसऱ्या दिवशीही रुग्णसेवेत रुजू होऊ शकतील, असे केंद्रीय आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. मात्र, कोरोनाच्या आणि पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा या तिसऱ्या लाटेत रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदले आहे. पण रुग्णांची संख्या पहिल्या दोन लाटेपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना उपचाराचे नवीन मार्गदर्शक तत्त्व केंद्राने जाहीर केले. त्यात याचा उल्लेख केला आहे.
कोरोनाबाधीत रुग्णांची सेवा करताना डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गाचा धोका असतो. त्यामुळे रुग्णांवर उपचार किंवा त्यांची शुश्रूषा करताना विषाणूंचा संसर्ग होणार नाही, अशी व्यवस्था उभारण्याची सूचना यात दिली आहे. तसेच, कोरोना संसर्ग झाल्यास त्यांची तपासणी आणि विलगिकरणाच्या व्यवस्थेबाबतच्या सूचनांचा यात समावेश आहे.

रुग्णसेवा करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यास तातडीने त्यांनी विलगिकरण करावे. आवश्यकता असल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करावे किंवा त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत असेल, तर त्यांनी ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’मध्ये उपचारासाठी दाखल होण्याचा सल्ला यात दिला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनाही गृहविलगिकरणात उपचार सुरू असतील आणि त्यांना ताप नसेल. तसेच, कोरोनाची ठळक लक्षणे नसतील, तर ते तिसऱ्या दिवशीही रुग्णसेवेसाठी रुग्णालयात दाखल होऊ शकतात. मात्र, त्यांनी व्यवस्थित कोरोना प्रतिबंधक साधनांचा वापर करून रुग्णसेवा करण्याची सूचना या मार्गदर्शक पत्रात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com