वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत
वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत

वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : "लहानपणापासून भाषेचे व वाचनाचे संस्कार मुलांवर होणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळेमध्ये होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा या खूप प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात. शाळेमध्ये शिकविली जाणारी मराठी भाषा ही आपली खरी शिदोरी आहे,'''' असे मत चित्रपट दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी नुकतेच व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी एचएचसीपी हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागातर्फे आयोजित १६ व्या शालेय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपात ते बोलत होते. यावेळी व्यंगचित्रकार चारुहास पंडित, भाग्यश्री पंडित, अभिनेता शुभंकर अत्रे, अनिमेष पाध्ये, सोसायटीच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका रंजना वाठोरे, संमेलनाची उपाध्यक्षा विद्यार्थिनी प्रेरणा पवार आदी उपस्थित होते. पंडित यांनी दुसऱ्या सत्रात उपस्थितांसमोर व्यंगचित्राचे प्रात्यक्षिक दिले.
गोडबोले म्हणाले, ‘‘चित्रपट व दूरचित्रवाणी ही माध्यमे लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत. या माध्यमाचा उपयोग करून मराठी साहित्याचा प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.’’
कार्टून्स ही अधिकतम परदेशी असल्याने भारतीयांशी भावनिक पातळीवर जोडली जात नाहीत. मात्र, चिंटूच्या माध्यमातून फक्त लहान मुलांसाठी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी मालिका तयार करण्यात आली. हे चित्रण निरागस असून मराठीतून आहे, हे महत्त्वाचे. त्यामुळे अशी अर्कचित्रे आपल्याला जवळची वाटतात.
- चारुहास पंडित, व्यंगचित्रकार
35657

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top