पुणे शहर परिसरामध्ये थंडीचा कडाका ओसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहर परिसरामध्ये
थंडीचा कडाका ओसरला
पुणे शहर परिसरामध्ये थंडीचा कडाका ओसरला

पुणे शहर परिसरामध्ये थंडीचा कडाका ओसरला

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : शहर परिसरात थंडीचा कडाका कमी झाला आहे. या भागात रविवारपर्यंत (ता.१६) आकाश अंशतः ढगाळ राहणार असून सकाळी धुके पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शहरात शुक्रवारी शहरातील सरासरी किमान तापमान १३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मागील आठवडाभर दुपारपर्यंत ढगाळ हवामान आणि किमान तापमानात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी कमी झाली असून, रविवारपर्यंत सरासरी किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. परिसरातही मंगळवारनंतर (ता. १८) आकाश निरभ्र राहून किमान तापमानात काही अंशी घट होणार असल्याचे हवामान विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

दक्षिण कोकणातून येणारे चक्रीय वारे राज्यात काही प्रमाणात आद्रता घेऊन येत आहे. तसेच विदर्भातील तुरळक पाऊस आणि ढगाळ हवामानाचा परिणाम उर्वरित राज्याच्या हवामानावर होत आहे. दरम्यान,
विदर्भ वगळता उर्वरित राज्यात आठवडाभर हवामान मुख्यतः कोरडे राहील. दक्षिण कोकणात तयार झालेली चक्रावताची स्थितीमुळे राज्यात पाऊस पडणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top