मगरपट्टा सिटी ग्रुपचा
मार्गदर्शक प्रवास 
आज साम टीव्हीवर

मगरपट्टा सिटी ग्रुपचा मार्गदर्शक प्रवास आज साम टीव्हीवर

पुणे, ता. १४ ः एखाद्या प्रकल्पात भूमिपुत्रांना सहभागी करून घेऊन, त्यांचा व कुटुंबाचा आर्थिक स्तर कसा वाढविता येऊ शकतो? तेच, त्यातून विकासाच्या नव्या संधी कशा उपलब्ध होतील?, त्यातून परिसराचाच कसा विकास घडवून आणता येवू शकतो? हे ‘मगरपट्टा सिटी ग्रुप’च्या प्रकल्पांनी दाखवून दिले आहे. सहकारातून विकास हे आर्थिक क्षेत्रातील धोरण बांधकाम क्षेत्रात यशस्वीपणे राबवून सर्व सुविधांनी संपन्न अशा एकीकृत टाऊनशीप्स अशी देशभर ओळख मिळवणारा हे प्रकल्प आहेत.
असे वेगळे टाऊनशीपचे प्रकल्प उभा करणाऱ्या मगरपट्टा सिटी ग्रुपच्या उभारणीचा प्रवास महाराष्ट्र ब्रँडमधून मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रीय बँड्सना सलाम करणारा हा कार्यक्रम सध्या साम टीव्ही प्रसारित केला जातो आहे. त्याअंतर्गत शनिवारी (ता. १५ ) दुपारी ३ वा. २५ मि. वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com