atm
atmsakal

एटीएम मशिन तोडफोडप्रकरणी कोंढवा, खडकीत गुन्हे दाखल

चोरट्यांकडून एटीएम मशिनची तोडफोड करून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रयत्न

पुणे : चोरट्यांकडून एटीएम मशिनची (ATM Machine)तोडफोड करून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रयत्न केल्याच्या दोन घटना शहराच्या वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. या घटनेमध्ये रोख रकमेची चोरी झाली नाही. मात्र, मशिनचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी कोंढवा व खडकी पोलिस ठाण्यात (kondhwa khadki police Station)गुन्हे दाखल झाले आहेत.

atm
पुणे जिल्हा बँकेवर अनुभवी चेहरा, चर्चेतल्या नावांना पवारांचा धक्का?

कोंढव्यातील घटनेप्रकरणी राहुल नायर (वय ३७, रा. खराडी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते कोंढव्यातील कोणार्क इंद्रायू या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेमध्ये व्यवस्थापक आहेत. चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे तीन वाजता एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे व मशिनची तोडफोड केली. चोरट्यांनी पाच हजार रुपयांचे नुकसान केले.
खडकी येथे झालेल्या घटनेप्रकरणी उमेश लामखेडे (वय ३५, रा. मोशी) यांनी फिर्याद दिली. लामखेडे हे बाणेर येथील युरोनेट इंडिया प्रा. लि. या कंपनीचे अधिकारी आहेत. त्यांच्या कंपनीतर्फे एचडीएफसी बॅंकेच्या एटीएम केंद्रांचेही काम पाहिले जाते. गुरुवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास चोरटे एटीएम केंद्रात घुसले. त्यांनी एटीएम तोडून पैसे चोरीचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पैसे चोरता आले नाहीत. त्यांनी एटीएम मशिनचे १० हजार रुपयांचे नुकसान केले.(Pune Crime News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com