विशेष अल्पवयीन मुलाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष अल्पवयीन मुलाचा खून
विशेष अल्पवयीन मुलाचा खून

विशेष अल्पवयीन मुलाचा खून

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : विशेष अल्पवयीन मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोथरुडमधील मोहिते कॉलेज मैदानाच्या परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. करण गोपाल राठोड (१४) असे खून झालेल्याचे मुलाचे नाव आहे. एकलव्य चौक परिसरात मोहिते कॉलेजचे मैदान आहे. तेथे गुरुवारी सायंकाळी काही लहान मुले खेळत होती. त्यावेळी त्यांना मैदानातील पोत्यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसले. त्यामुळे मुलांनी तत्काळ कोथरूड पोलिसांना याबाबत कळविले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलिस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे यांच्यासह अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोत्यामध्ये मृतदेह आढळून आला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..