लैंगिक अत्याचारप्रकरणी एफआयर रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लैंगिक अत्याचारप्रकरणी एफआयर रद्द
लैंगिक अत्याचारप्रकरणी एफआयर रद्द

लैंगिक अत्याचारप्रकरणी एफआयर रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : आयुष्यातील सकारात्मक बाजूवर लक्ष केंद्रित करायचे असल्याने अत्याचाराची एफआयआर रद्द करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रमाणपत्र मुलीने न्यायालयास दिल्यानंतर या गुन्ह्यातील एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम एम. मोडक यांनी हा आदेश दिला. शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी मुलगी १७ तर आरोपी हा २० वर्षांचा होता. आरोपीने मुलीला अज्ञात ठिकाणी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणात अ‍ॅड. स्मिता पाडोळे व अ‍ॅड. शीतल शिंदे यांनी काम पाहिले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top