Covid care center
Covid care center esakal

हडपसरमध्ये कायम स्वरूपी कोवीड रुग्णालय

पुणे, ता. १७ : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी हडपसर परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील महापालिकेच्या दवाखान्यात दाखल व्हावे लागत होते. मात्र ही गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या हडपसर येथील अण्णासाहेब मगर रूग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ५५ बेडचे रुग्णालय उभे केले आहे. यामध्ये लहान मुलांच्या एनआयसीयूसह मोठ्या व्यक्तींचा आयसीयूचा समावेश आहे. हडपसर भागतील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी अण्णासाहेब मगर रुग्णालय सुरू करण्यात आले. तेथे सध्या ओपीडी आणि प्रसूतिगृह आहे. महापालिकेने बाणेर येथे २५८ बेड क्षमतेचे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उभारले आहे. सध्या कोरोनाची रूग्णसंख्या वाढताना बाणेर येथील रुग्णालयावरच जास्त भार आहे. 

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अण्णासाहेब मगर रुग्णालयात रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. तिसऱ्या लाटेतही या ठिकाणी क्वारंटाईन करण्यासाठी नियोजन केले जात आहे. कोरोनाच्या रुग्णांवर गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच लहान मुलांना कोरोना झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यास याठिकाणी उपचाराची सुविधा निर्माण केली आहे. त्यामुळे हडपसर व परिसरातील नागरिकांना बाणेर, शिवाजीनगर येथील रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही.

मगर रुग्णालयात आमदार निधीतून वैद्यकीय साधनसामुग्री घेण्यात आली आहे. सीएसआर फंडातून ऑक्सिजन प्लांटही बसविण्यात आला आहे. रुग्णालयात आयसीयू फिजिशियन, चार नर्स, चार मेडिकल आॅफिसर यांच्यासह २० वैद्यकीय कर्मचारी असा वैद्यकीय सेवक वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.

‘‘अण्णासाहेब मगर रूग्णालयात ओपीडी व प्रसूतिगृह या सुविधा आहेत. पण आता हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल होणार आहे. या ठिकाणी ५५ बेड असून लहान मुलांसाठी १२ बेडचे एनआयसीयू व मोठ्यांसाठी १२ बेडचे आयसीयू आहे. याठिकाणी महापालिकेचा निधी, आमदार निधी व सीएसआर मधून सुविधा निर्माण केल्या आहेत.’’ 
-डॉ. अंजली साबणे, सहाय्यक आरोग्य प्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com