Covaxin
CovaxinSakal

कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस कधी? ज्येष्ठ नागरिकांचा प्रशासनाला सवाल

‘मला गेल्या वीस वर्षांपासून मधुमेह आहे. हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलाय. कोरोनाची अक्षरशः भीती वाटतेय. त्यामुळे मी घराबाहेरही पडत नाही. मला कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घ्यायचाय.
Summary

‘मला गेल्या वीस वर्षांपासून मधुमेह आहे. हृदयविकाराचा एक झटका येऊन गेलाय. कोरोनाची अक्षरशः भीती वाटतेय. त्यामुळे मी घराबाहेरही पडत नाही. मला कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस घ्यायचाय.

पुणे - ‘मला गेल्या वीस वर्षांपासून मधुमेह (Diabetes) आहे. हृदयविकाराचा (Heartattack) एक झटका येऊन गेलाय. कोरोनाची (Corona) अक्षरशः भीती वाटतेय. त्यामुळे मी घराबाहेरही पडत नाही. मला कोव्हॅक्सिनचा (Covaxin) बूस्टर डोस (Booster Dose) घ्यायचाय. पण, तो काही मिळता मिळत नाही. दुसरा डोस (Second Dose) घेऊन दहा महिने झाले आहेत. सांगा आता आम्ही बूस्टर डोस कधी घ्यायचा,’ असा सवाल ज्येष्ठ नागरिक मधुकर कुलकर्णी यांनी केला.

शहरात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी यापूर्वी घेतलेल्या लशीचा तिसरा म्हणजे बूस्टर डोस देण्यात येत आहे. पण, भारत बायोटेकने उत्पादित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीचा पुरवठा गेल्या महिन्याभरापासून अनियमित झाला आहे. त्याचा थेट फटका बूस्टर डोससाठी पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बसत असल्याचे चित्र शहरात दिसते. त्या पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येत आहेत. ज्येष्ठ नागरिक प्रकाश दंडवते म्हणाले, ‘‘मला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास आहे. मी गेल्या वर्षी मे महिन्यात कोव्हॅक्सिनची लस घेतली. त्याला नऊ महिने झाले. आता लस मिळत नाही. कधी मिळेल हेही समजत नाही.’’

Covaxin
पुणे महापालिकेच्या जागा नगरसेवकांच्या ताब्यात ?

महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘‘महापालिकेला दहा हजार डोस राज्य सरकारकडून मंगळवारी मिळाले होते. त्या आधारावर बुधवारी ४५ केंद्रांमधून कोव्हॅक्सिनचे लसीकरण झाले. त्यातील शिल्लक डोस गुरुवारी (ता. १७) दहा शाळांमधून वितरित करणार आहेत. कारण, ज्येष्ठ नागरिक, फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचारी यांचे कोव्हॅक्सिनचे किमान दोन डोस झाले आहेत. पण, १५ ते १८ वर्षे वयोगटातील बहुतांश मुला-मुलींचा पहिला डोस आहे, तर काही मुलांना दुसरा डोस आहे. शाळेमुळे मुलांना प्राधान्याने लस देण्यात येत आहे.’’

‘लशीसाठी सातत्याने पाठपुरावा’

राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्याला सोमवारी तीन लाख कोव्हॅक्सिन लशीचे डोस मिळाले. ते सगळे विविध जिल्ह्यांना वितरित करण्यात आले. त्यानंतर नव्याने लशीचा पुरवठा झाला नाही. पुरवठा झाल्यानंतर तातडीने त्याचे वितरण जिल्ह्यांना करण्यात येईल. त्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.’’ केंद्र सरकारकडून राज्याला कोव्हॅक्सिन लस मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये कोव्हॅक्सिनचे ४५ लाख डोस मिळावे, अशी मागणी जानेवारीमध्येच केंद्राला केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com