राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांचे आमरण उपोषण मागे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांचे आमरण उपोषण मागे
राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांचे आमरण उपोषण मागे

राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांचे आमरण उपोषण मागे

sakal_logo
By

कात्रज, ता. २१ : कात्रजसह नव्याने समाविष्ट गावातील मूलभूत सुविधा व विकास कामांबाबत सुरू असलेले उपोषण गुरुवारी मागण्या मान्य झाल्यावर मागे घेण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते नमेश बाबर यांनी कात्रज चौकात ‘माझं कात्रज, माझा अभिमान’ याअंतर्गत रविवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. उपोषणाच्या पाचव्या दिवशी आयुक्त विक्रम कुमार व शिष्टमंडळात बैठक झाली. महापालिकेच्या पातळीवरील पाणीपुरवठा, मुस्लिम दफनभूमी रस्त्यासह अन्य मागण्या मान्य केल्याचे लेखी पत्र दिले. त्यानंतर बाबर यांनी आमदार चेतन तुपे, आमदार संजय जगताप व मातोश्री प्रमिला बाबर यांच्या हस्ते ज्यूस घेऊन उपोषण सोडले. बाबर म्हणाले, ‘‘महापालिका प्रशासन पातळीवरील पाणी, दफनभूमी रस्ता व अन्य मागण्या मान्य झाल्याचे लेखी पत्र मिळाले. तसेच, राज्यशासन व पीएमआरडीए यांच्याकडील मागण्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार तुपे व जगताप यांनी ठोस आश्‍वासन दिले आहे.’’ तुपे म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नमेश बाबर यांची बैठक शुक्रवारी होणार आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top