cyclones in the Indian Ocean
cyclones in the Indian Oceansakal

हिंदी महासागरातील चक्रीवादळांच्या तीव्रतेत वाढ

अरबी समुद्रातील चक्रवादळांची वारंवारता तसेच मॉन्सूनपूर्व हंगामात निर्माण होणाऱ्या चक्रवीदळातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे.

पुणे : अरबी समुद्रातील चक्रवादळांची वारंवारता तसेच मॉन्सूनपूर्व हंगामात निर्माण होणाऱ्या चक्रवीदळातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. चक्रीवादळांमुळे झालेल्या जागतिक मृत्यूंपैकी ८० टक्के पेक्षा जास्त मृत्यू हे उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांमुळे होत असल्याचे नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. वादळांमुळे निर्माण झालेल्या आपत्तींमुळे प्रतिवर्षी कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) वतीने केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासाबाबतची माहिती ‘अर्थ सायन्स’ या नियतकालिकेत प्रकाशित केली आहे. त्यानुसार जागतिक तापमानवाढीमुळे उत्तर हिंदी महासागरातील तापमान देखील वेगाने वाढत आहे. यातून होत असलेल्या उष्णतेच्या पुरवठ्यामुळे ही चक्रीवादळे अधिक तीव्र होत आहेत. चक्रीवादळांची संख्या ६ टक्क्यांपेक्षा कमी असली तरी त्याची तीव्रता अधिक असल्याने चक्रीवादळांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.

याबाबत ''आयआयटीएम''चे विनीत कुमार यांनी सांगितले की, ‘‘चक्रीवादळांची तीव्रता वाढण्यामागचे कारण काय आहे, हे समजून घेण्यासाठी १९८० ते २०१९ या कालावधीतील चक्रीवादळांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये मॉन्सूनपूर्व आणि मॉन्सूननंतरच्या काळातील चक्रीवादळांची संख्या, वेग व त्यांची तीव्रता यावर भर देण्यात आला.’’

यापूर्वीच्या चक्रीवादळांचा ताशी वेग
- १९८० ते १९९० (मॉन्सूनपूर्व) : १०० किलोमीटर (५४.२ नॉट्स)
- २००० ते २०१९ (मॉन्सूननंतर) : १३८ किलोमीटर (७५ नॉट्स)

बंगालच्या उपसागरात ४ टक्के तर, अरबी समुद्रात २ टक्क्यांपेक्षा कमी चक्रीवादळांची निर्मिती होते. अम्फान चक्रीवादळ हे २४ तासांमध्ये पहिल्या श्रेणीतून (सुमारे १०० किमी/तास) पाचव्या श्रेणीच्या (२५० किमी/तास) चक्रीवादळात रुपांतरीत झाले होते. इतक्या कमी वेळेत चक्रीवादळांची तीव्रता वाढल्याने आपत्ती व्यवस्थापनेसाठी पुरेसा वेळ प्रशासनाला मिळत नाही. त्यात सातत्याने महासागरातील निरीक्षणे होत नसल्याने चक्रीवादळांच्या तीव्रतेचे निरीक्षण करणे तसेच अंदाज वर्तविणे आव्हानात्मक ठरत आहे. हवामान बदलामुळे महासागर गरम होत आहे. तापमान २८-२९ अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असल्यास अरबी समुद्र आणि बंगालच्या उसागरातील चक्रीवादळांच्या तीव्रतेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. अलीकडच्या दशकात महासागर-चक्रीवादळांमध्ये बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सुधारित निरीक्षणांसह यावर सातत्याने पाहणी करणे आवश्‍यक आहे.
- रॉक्सी मॅथ्यू, शास्त्रज्ञ - आयआयटीएम

अभ्यासातील निष्कर्ष
- चार दशकांपूर्वीच्या तुलनेत अलीकडच्या काळात अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमानात १.२ ते १.४ अंश सेल्सिअसने वाढ.
- उत्तर हिंदी महासागरातील जलद तापमानवाढ व त्यातून उष्णतेचा प्रवाहामुळे चक्रीवादळे तीव्र.
- जागतिक स्तरावर महासागरातील उष्णतेच्या एकूण वाढीच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त योगदान उत्तर हिंदी महासागराचे

आव्हाने आणि संधी
- चक्रीवादळांचा प्रवास आणि लँडफॉल पोझिशन्सचा अंदाज कालांतराने सुधारला आहे
- अलीकडच्या काळात मानवी मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे
- कमी वेळेत चक्रीवादळांच्या तीव्रतेचा अंदाज लावणे आव्हानात्मक
- चक्रीवादळांचा अंदाज वर्तविण्यारी प्रणाली तातडीने सुधारण्याची गरज
- महासागरातील निरीक्षणांसाठी मुरिंग्ज आणि बोएच्या संख्येत
झालेली वाढ महासागराच्या परिस्थितीचा अधिक अचूक अंदाज देऊ शकते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com