electric Charging station
electric Charging stationsakal

पुणे शहरात ई-व्हेईकलच्या चार्जिंग स्टेशनला मान्यता

शहरात ई व्हेईकलचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत.

पुणे : शहरात ई व्हेईकलचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी व ई व्हेईकलला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला होता. त्यास शुक्रवारी (ता.२५) मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकार व राज्य सरकारकडून ई व्हेईकल खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. पुणे महापालिकेकडूनही ई कार भाड्याने घेण्याचा निर्णय यापूर्वी घेतला होता, पण अद्याप या कारचा पुरवठा झालेला नाही. त्यानंतर स्वतंत्र निविदा काढून ई कार भाड्याने घेतल्या जाणार आहेत. शासकीय स्तरावर ई व्हेईकल घेण्याचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांकडूनही ई दुचाकी व कार खरेदी करण्याकडे पसंती देत आहेत. भारत ही जगातील चौथी वाहन बाजारपेठ आहे. पण त्याच्या इंधनासाठी ८० टक्के कच्चे तेल अन्य देशांतून आयात करावे लागते. दिवसेंदिवस इंधनाची गरजही वाढत असल्याने आता इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन दिले आहे.

शहरात ई व्हेईकल वापरासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
-हेमंत रासने, अध्यक्ष : स्थायी समिती

शाहू उद्यानात उभारणार सेव्हन थी थिएटर
पुणे महापालिकेच्या रास्ता पेठेतील श्री छत्रपती शाहू महाराज उद्यानात पावणे तीन कोटी रुपये खर्च करून ७ डी थिएटर उभारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. ७ डी थिएटरमुळे मध्यवर्ती पुण्यातील नागरिकांना विशेषतः: लहान मुलांसाठी सेव्हन डी थिएटर आकर्षणाचे केंद्र असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com