
येरवडातील अपघातग्रस्त कामगारांच्या वारसांना मदत
पुणे, ता. २६ ः येरवडा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरु असताना ३ फेब्रुवारी २०२२ ला अपघात झाला होता. यात पाच बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर चार कामगार जखमी झाले होते. या कामगारांना मदतीची घोषणा केली होती. मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख आणि तर जखमी कामगारांना प्रत्येकी दोन लाखांची मदत अप्पर कामगार आयुक्त आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने केली.
कल्याणकारी मंडळामध्ये कामगारांची नोंद नसल्यामुळे मदत मिळण्यास अडचण येत होती. यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व बांधकाम मजदूर सभा, वर्किंग पीपल चार्टर, कामगार संघटनांचा मंच यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कामगारांना अल्पावधीत मदत मिळवून देण्यात यश आले. कामगारांच्या नातेवाइकांना बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून बोलावले होते.
यावेळी आमदार सुनील टिंगरे, पुणे विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त अभय गीते, बांधकाम मजदूर सभेचे संस्थापक- सरचिटणीस नितीन पवार, अध्यक्ष ॲड. मोहन वाडेकर, शहराध्यक्ष मेहबूब नदाफ, सहायक कामगार आयुक्त मुजम्मील मुजावर, दत्ता पवार, काशिनाथ नखाते, अंजुम इनामदार उपस्थित होते. मजदूर सभेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मंडळाकडून २१ दिवसांत आर्थिक मदत मिळणे शक्य झाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..