अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

नरेश धोत्रे यांची
सदस्य पदी निवड

पुणे, ता. २८ ः संजय गांधी निराधार अनुदान योजना (कसबा, विधानसभा मतदारसंघ) समितीच्या सदस्यपदी नरेश आत्माराम धोत्रे यांची निवड झाली. युवा सामाजिक संस्था, भावना ऋषी विकास संस्था, अखिल महाराष्ट्र स्वकुळी साळी समाज संस्था, कर्नाटक स्वकुळी साळी समाज संस्था आदी संस्थांवर विविध पदावर धोत्रे कार्यरत आहेत. पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले. यावेळी नगरसेवक अविनाश बागवे, यासीर बागवे, शाबीर खान, चेतन आगरवाल यांनी धोत्रे यांचे विशेष अभिनंदन केले.


आतिश कोळी दक्षता समितीच्या सदस्यपदी
पुणे ः सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी आतिश कोळी यांची निवड झाली. कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र दिले. नगरसेवक अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक, प्रवीण करपे, सुरेश कांबळे, संजय चव्हाण, गणेश तामकर, गोरख पळसकर, गणेश शेडगे, आदी उपस्थित होते.

अबुधाबी हिंदू मंदिरास माती, जल अर्पण
पुणे ः परम पूज्य प्रमुखस्वामीजी महाराज यांचे आशीर्वादाने आणि प. पु. ब्रम्हविहारी स्वामी यांच्या परिश्रमातून बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण संस्थेतर्फे अबुधाबी येथे सर्वात मोठे हिंदू मंदिर बांधले जात आहे. या बांधकामाच्या पायामध्ये संस्थेचे हितेंद्र सोमाणी यांनी ३२ दिवसात १५ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांनी भ्रमण करून २९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून संकलित केलेली पवित्र माती व जल अर्पण केले. हे मंदिर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कुशल तंत्रज्ञांसाठी स्वयंरोजगार शिबिर
पुणे ः रोटरी क्लब ऑफ पुणे हडपसर आणि युनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटरतर्फे कुशल तंत्रज्ञांसाठी स्वयंरोजगार शिबिराचे आयोजन केले. शिबिरात सुमारे ६५ प्रशिक्षित युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. यावेळी अॅड. अजय वाघ, अनुभवी संगणकतज्ञ डॉ. शरद जोशी, जाहिरात तज्ञ, यशवंत कुलकर्णी, व्यवसाय मार्गदर्शक रमेश बेंद्रे, उद्योजक राहुल ठाणेकर, विजया खोले, उदय शेटे आदी उपस्थित होते. व्यवसायास मदत करणाऱ्या जिल्हा उद्योग केंद्र, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँका, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची विस्ताराने माहिती बेंद्रे यांनी सांगितली. या शिबिरात फॅशन डिझाईनिंग, मोबाईल दुरुस्ती, इलेक्ट्रीशियन आदी विषयांत प्रशिक्षण घेत असल्याचे तांत्रिक संस्थेचे प्रमुख विजय कुलकर्णी यांनी सांगितले.


दीपक तोष्णीवाल यांना पुरस्कार
पुणे ः रोटरी क्लब फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष दीपक तोष्णीवाल यांना मानवतावादी उत्कृष्टता पुरस्कार गौरव गौतम व आय कॅन फाउंडेशन जयपूर यांच्या वतीने ऑनलाइन प्रदान करण्यात आला. तोष्णीवाल यांनी कोरोना काळात, रक्तदान, मास्क सानिटायझर वाटप, रुग्णांना बेड मिळवून देणे, ऑक्सिजन मिळवून देणे आदी कार्य केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top