वसतिगृहे गजबजली; पेठा झाल्या हाउसफुल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसतिगृहे गजबजली; पेठा झाल्या हाउसफुल
वसतिगृहे गजबजली; पेठा झाल्या हाउसफुल

वसतिगृहे गजबजली; पेठा झाल्या हाउसफुल

sakal_logo
By

स्वारगेट, ता. २८ : गेली दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांविना शहराच्या मध्य भागतील रिकामी झालेली वसतिगृहे पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. त्यामुळे वसतीगृहचालक, सदनिका व खोल्या भाडेतत्त्वावर देणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

शहराच्या मध्यभागातील सदाशिव, शनिवार, शुक्रवार, नारायण, कसबा, नवीपेठ, स्वारगेटजवळील भागात अनेक स्पर्धा परीक्षा केंद व नामवंत शिक्षण संस्था असल्याने या भागाजवळ राहण्यास हजारो विद्यार्थी पसंती देतात. हा भाग शहराच्या मध्यभागी असून सर्व सुविधा मिळत असल्याने येथे राहण्यास विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी शहरातून काढता पाय घेतला. त्यामुळे वसतिगृहे, खोल्या मोकळ्या पडल्या. त्यामुळे वसतीगृहचालकांना आणि घरे भाडेतत्त्वावर देणाऱ्या व्यवसायिकांना मोठा फटका बसला होता. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यातच मिळणारे भाडे हेच काही घर मालकांचे मुख्य उदरनिर्वाहाचं साधन आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लाट ओसरल्यानंतर बरेच खासगी स्पर्धा परीक्षा क्लासेस, महाविद्यालये ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी पुन्हा शहरात आले आहेत. त्यामुळे रिकामी झालेले वसतिगृहे, खोल्या, सदनिका भरल्या आहेत. मध्य भागात राहण्यासाठी साधारण ५० ते ७५ लहान-मोठी वसतिगृहे, सदनिका, छोट्या खोल्या उपलब्ध आहेत. मात्र येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे राहण्यासाठीच्या जागेची आता चणचण भासू लागली आहे. परिणामी वसतीगृह व सदनिकेसाठी द्याव्या लागणाऱ्या भाडे रकमेतही वाढ झाली आहे. काही वसतीगृहांत १०० चौरस फुटांच्या खोलीत चार-पाच विद्यार्थी दाटीवाटीने राहत आहेत.


८ ते १५ हजार
- सदनिका भाडे

मुलांना ३ हजार ते ४ हजार
- वसतीगृह (एक बेड)

मुलींना ४ ते ५ हजार
- वसतीगृह (एक बेड)

किमान ३ हजार
- छोट्या खोल्या


कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात आमचे प्रचंड नुकसान झाले. कधी कोरोना जाईल, याची आम्ही वाट पाहत होतो. मात्र पुन्हा पहिल्यासारखे चित्र निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.
- दिलीप हुडके, घर मालक

गेल्या पाच वर्षांपासून माझा वसतिगृहाचा व्यवसाय आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे मी तोटा सहन केला. आता कोरोनाची लाट ओसरल्यानंतर विद्यार्थी पुन्हा शहरात येऊ लागले आहेत. त्यामुळे वसतीगृह भरले आहे. सध्या माझ्याकडे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहेत.
- विक्रम गायकवाड, हॉस्टेल व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..