पूर्व भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद
पूर्व भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

पूर्व भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः भामा आसखेड प्रकल्पातंर्गत विमानगर टाकीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील काही भागांचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (ता. ३ मार्च) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. विमाननगर टाकीची पाण्याची मुख्य लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे काम होणार आहे. तसेच या लाइनवर फ्लो मीटर बसविण्याच्या कामामुळे पुढील भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. पाणी पुरवठा बंद राहणारा भाग ः विमाननगर व परिसर, संजय पार्क, म्हाडा कॉलनी, एसआरए भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधी नॉर्थ व साऊथ आदी.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..