
मुलीचा विनयभंग करणाऱ्या बापाचा मुक्काम कारागृहातच
पुणे, ता. २८ : आजारी असल्याने झोपलेल्या मुलीला अश्लील पद्धतीने स्पर्श करून तिचा विनयभंग करणाऱ्या बापाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी आरोपीविरोधात पुरावे आहेत. मुलीने केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून याबाबत मुलगी आणि तिच्या आर्इचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी फेटाळला. या बाबत १७ वर्षीय मुलीने तिच्या ४७ वर्षीय वडिलांविरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ मध्ये घडला. या गुन्ह्यातील आरोपी हा वाहनचालक आहे. फिर्यादी हिला एक लहान तर दोन मोठ्या बहिणी आहेत. आरोपीला दारूचे व्यसन असून फिर्यादी व तिची लहान बहिण घरात असताना तो अंगावरील सर्व कपडे काढून घरात बसत. याबाबत पत्नीने समजल्यानंतर त्याने तिला अंगावर पेट्रोल टाकून मारेल किंवा सगळ्यांना चाकू भोसकून मारेल, अशी धमकी देत. फिर्यादीच्या लहान मुलीला आरोपी बापाने पैशाचे आमिष दाखवून घरातील पोटमाळ्यावर बोलावले होते. तेव्ही ती आरडाओरडा करीत घरातून बाहेर आली होती. मात्र, बदनामी नको म्हणून त्यांनी त्यावेळी तक्रार दिली नव्हती. पण, त्यानंतरची बापाचे गैरप्रकार सुरूच राहिल्याने मुलीने तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आरोपीने जामिनासाठी केलेल्या अर्जास सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी विरोध केला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..