खडतर प्रवास... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Metro
लीड

पुणे मेट्रो धावणार, पण रस्त्यांचं काय?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे रविवारी उद्‍घाटन होत आहे. ३१ किलोमीटरच्या या मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतुकीची समस्या काही प्रमाणात तरी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

शहरात १८०० किलोमीटरचे रस्ते आहेत. शहरात सुमारे ३० लाख वाहने आहेत. सक्षम सार्वजनिक वाहतुकीची सेवा नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या शहरात वाढत आहे. त्यातच असलेले रस्ते पुरेसे रुंद नसल्यामुळे दुचाकी वाहनांचा वापर वाढता आहे. अशा परिस्थितीत रस्त्यांची अवस्था चांगली असणे गरजेचे आहे. परंतु, शहरातील प्रमुख रस्त्यांचा आढावा घेतला तर, खड्डे, अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि पोलिसांच्या पुरेशा नियमनाचा अभाव दिसून येते. त्यातूनच दुचाकीचालकांना वाट काढत आपला प्रवास करावा लागतो. त्यातून त्यांच्यावरील शारीरिक आणि मानसिक ताणही वाढत आहे. यासाठी महापालिका आणि पोलिस पुरेशा उपाययोजना करणार कधी, असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsMetro
go to top